
तेलंगणामध्ये एका महिलेने रेल्वे ट्रॅकवर आपली कार चालवल्याची घटना समोर आली आहे. ज्यामुळे रेल्वे कर्मचारी आणि स्थानिकांमध्ये घबराट पसरली. ही घटना बुधवारी (२५ जून २०२५) घडली. जेव्हा महिलेने अचानक गाडी ट्रॅकवर वळवली आणि बराच अंतर चालवत राहिली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु ती तेथून लगेच पळून गेली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.