Trending News: एकाच वेळी १६ ठिकाणी करायची नोकरी; पगारातून बंगलाही घेतला; कसं फसवलं कंपन्यांना?

१६ नोकऱ्या एकावेळी करता येण्यासाठी तिने प्रत्येक माहिती आपल्याजवळ लिहून ठेवली होती. म्हणजे कंपनीचं नाव, जॉईनिंग तारीख, पदाचं नाव, वेगवेगळे सॅलरी अकाऊंट्स, वगैरे.
Commissioner of State Examination Council Shailaja Darade arrested 5 Crore fraud of 44 people job scam
Commissioner of State Examination Council Shailaja Darade arrested 5 Crore fraud of 44 people job scamsakal

एका महिलेने केलेल्या फसवणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ती एकावेळी वेगवेगळ्या १६ कंपन्यांमध्ये नोकरी करत होती. पण आश्चर्याची गोष्ट अशी की ती कधीही ऑफिसला गेली नाही. तिने भरपूर पैसा कमावला. तीन वर्षे हे असंच सुरू होतं. यातून ती इतकी श्रीमंत झाली की तिने एक बंगलाही खरेदी केला. पण आता तिला पोलिसांनी पकडलं आहे.

या महिलेचं नाव गुआन यूई असून एका नोकरीच्या मुलाखतीवेळी ती पकडली गेली. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, गुआन मुलाखतीदरम्यान फोटो काढत होती. तिने वेगवेगळ्या कंपन्यांच्या चॅट गृपवर हे फोटो शेअर केले. तिने सगळ्या गृप्सवर या फोटोंखाली लिहिलं होतं की ती क्लाएंटसोबत मीटिंगमध्ये आहे. पण यावेळी तिला रंगेहाथ पकडण्यात आलं. १६ नोकऱ्या एकावेळी करता येण्यासाठी तिने प्रत्येक माहिती आपल्याजवळ लिहून ठेवली होती. म्हणे कंपनीचं नाव, जॉईनिंग तारीख, पदाचं नाव, वेगवेगळे सॅलरी अकाऊंट्स वगैरे. (Trending News)

Commissioner of State Examination Council Shailaja Darade arrested 5 Crore fraud of 44 people job scam
Trending News: फक्त ९८ पानांचं पुस्तक; पण तुम्ही हातात घेऊन वाचूही शकणार नाही; काय आहे कारण?

गुआनच्या या गुन्ह्यामध्ये तिचा पती चेन कियांही सामील आहे. जानेवारी २०२३ मध्ये एका कंपनीचे मालक लियू जियान यांना कागदपत्रांमध्ये काहीतरी घोळ असल्याची शंका आली. ऑक्टोबर २०२२ मध्ये या कंपनीने टीम लिडर सह सात लोकांना कामावर रुजू करून घेतलं. यामध्ये टीम लीडरचा पगार २० हजार युआन होता आणि बाकीच्यांचा पगार याच्या निम्मा होता. या लोकांच्या सीव्हीमध्ये त्यांचा अनुभव चांगला सांगण्यात आला होता. पण हे लोक अपेक्षेप्रमाणे काम करू शकले नाहीत. त्यामुळे त्या सगळ्यांचे कॉन्ट्रॅक्ट थांबवण्यात आले.

यानंतर लियू यांना सगळ्यांच्या कागदपत्रांमध्ये गोंधळ असल्याची शंका आली. त्यांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिली. जेव्हा चौकशी केली तेव्हा लक्षात आलं की गुआनचे अनेक बँक अकाऊंट्स आहेत. या खात्यांमध्ये सॅलरीच्या नावाने खूप पैसा येत होता. पुढे कळालं की त्यांची एक मोठी टोळी आहे. ही टोळी कंपन्यांना फसवून नोकरी मिळवते. हे लोक खोटी कागदपत्रे आणि आकर्षक बायोडाटा तयार करून नोकरी मिळवतात. क्लाएंटसोबत मीटिंग करण्याची कारणं देतात आणि पगार घेतात. शेवटी कंपन्या त्रासाला कंटाळून स्वतःहून यांना नोकरीवरुन काढून टाकतात.

Commissioner of State Examination Council Shailaja Darade arrested 5 Crore fraud of 44 people job scam
Trending News: मजुराच्या खात्यात अचानक आले २०० कोटी रूपये; सगळं घर हादरलं, सुरक्षेची केली मागणी

गुआनच्या गृपच्या ५३ जणांना अटक करण्यात आली आहे. पण चीनमध्ये अशी पहिलीच घटना नाही. याच्या आधीसुद्धा अशा घटना समोर आल्या आहेत. यामध्ये एका आरोपीची गर्लफ्रेंड एचआर विभागात काम करायची आणि ती आरोपीला घोटाळे कऱण्यात मदत करायची.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com