Video: कुत्र्यालाही लागलं पाणीपुरीचं वेड; हा व्हिडिओ पाहिला का? | women Feeding Panipuri to dog viral video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video

Video: कुत्र्यालाही लागलं पाणीपुरीचं वेड; हा व्हिडिओ पाहिला का?

पाणीपुरी हा पदार्थ सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. पाणीपुरी म्हटलं की आपल्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. काही दिवसांपूर्वी हत्ती आणि गाय पाणीपुरी खात असताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर आता एक महिला आपल्या कुत्र्याला पाणीपुरी खाऊ घालतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(Feeding Panipuri to dog viral video)

हेही वाचा - Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या लहान कुत्र्याला हातात घेऊन पाणीपुरी खाऊ घालत आहे. पाणीपुरीच्या ठेल्यावरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगला व्हायरल झाला आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी या महिलेला ट्रोल केलं असून मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: Rahul Gandhi : भारत जोडो यात्रा थांबणार? लोकांकडून यात्रेला का होतोय विरोध

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

टॅग्स :DogVideoviral video