Viral Video : महिला वेटरचे ग्राहकांबरोबर असभ्य वर्तन; पदार्थ फेकले अन्...

Viral Video
Viral VideoSakal

आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यावर तेथील कर्मचाऱ्यांकडून चांगली सुविधा पुरवली जाते. तर ग्राहकांना चांगली सर्व्हिस देण्यासाठी हॉटेलचे कर्मचारी सदैव तत्पर असतात. पण एका रेस्टॉरंटमधील महिलेने ग्राहकांसोबत असभ्य वर्तन केल्याचं उघड झालं आहे.

सदर महिला कर्मचारी वेटरने ग्राहकांना पदार्थ देताना असभ्य वर्तन केलंय. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ग्राहकांनी हा व्हिडिओ शूट केला असून महिला पदार्थाच्या प्लेट आदळताना दिसत आहे. तर प्लेटमधील पदार्थ खातानाही दिसत आहे.

हेही वाचा - योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

दरम्यान, ग्राहकांकडे रागाने पाहून ती निघून गेल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. टीकटॉकवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून हॉटेल कर्मचाऱ्याचे असभ्य वातावरणामुळे अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com