प्लास्टिकच्या पॅकेटपासून असा बनतो Sunglass; जगातल्या पहिल्या कारखान्याचा Video Viral

हा व्हिडिओ एकदा पाहाच
Video
VideoSakal

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सध्या प्लास्टिकच्या पॅकेटपासून बनवण्यात येणाऱ्या चष्माच्या कारखान्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा पाहून आपल्याला कुतूहल निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. अनिश मालपाणी यांनी आपल्या ट्वीटरवरून हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा - ट्रेडिंग कुठल्याही प्रकारचे असो 'स्टाॅप लाॅस' हवाच

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चिप्सचे पॅकेट किंवा इतर प्लॅस्टिक वस्तूंचे तुकडे केले जातात आणि त्यावर प्रक्रिया करून चष्मा बनवला जात आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, हे उत्पादन आशाया नावाच्या कंपनीने उत्पादित केलेले अशून अनिश मालपाणी यांनी ही पोस्ट केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हे उत्पादन नॉन-बायोडिग्रेडेबल असलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार करण्यात आले आहे. पर्यावरणासाठी हा एक मोठा प्रयोग असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

आजपर्यंत मी या प्रक्रियेचा भाग राहिलो आहे याचं मला चांगलं वाटतंय. आज आम्ही प्लास्टिक पासून बनवलेला जगातला पहिला चष्मा सादर करत आहोत. तेही भारतात असं त्यांनी लिहिलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com