Viral Video
Viral VideoSakal

Dance Video : 'मानिके मागे हिते' गाण्यावरील युवकाचा डान्स पाहून पोरी घायाळ

गतवर्षात अनेक मराठी आणि हिंदी गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यामध्ये पुष्पा मधील श्रीवल्ली असेल किंवा मराठी चंद्रमुखी गाण्यातील चंद्रा हे गाणं असेल. त्याचबरोबर 'मानिके मागे हिते' या श्रीलंकन गाण्यानेसुद्धा भारतीय सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता त्या गाण्यावर एका तरूणाने भन्नाट डान्स केला आहे.

हेही वाचा - प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

तरूणाने केलेल्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका रेस्टॉरंटमधील आहे. एक तरूण 'मानिके मागे हिते' या गाण्यावर शानदार डान्स करत आहे. तर त्याचा हा डान्स पाहून आपणही चकित झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्याचा सफाईदार डान्स पाहून तेथील ग्राहक त्याला दाद देताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

दरम्यान, हा व्हिडिओ Talented Indian Dance या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत ७२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com