Viral Video : पठ्ठ्याने मेट्रोत नेली उशी अन् चादर; मोकळ्या सीटवर झोपी गेला

या पठ्ठ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral VideoSakal

आपल्या जगात वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या लोकांची कमी नाही. फेमस होण्यासाठी काहीजण नवनवीन प्रयोग करत असतात. तर सध्या एका तरूणाचा व्हिडिओ व्हायरल होत असून या पठ्ठ्याने थेट मेट्रोमध्येच चादर आणि उशी टाकून झोप काढली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Viral Video
Viral Video : बजरंग बलीसमोरच 'बिकिनी शो'? महिलांच्या स्पर्धेवर काँग्रेसची टीका

व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये एक तरूण मेट्रोच्या मोकळ्या सीटवर उशी आणि चादर टाकून झोपी जाताना दिसत आहे. तर इतर प्रवाशी त्याच्याकडे कुतूहलाने पाहत आहेत. "मेट्रोमध्ये कोण झोप काढतं का? तेही उशी आणि चादर टाकून" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर काही प्रवाशांना हे चित्र पाहून आपलं हसू आवरलं नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com