Video : देशी जुगाड! पठ्ठ्याने चक्क दुचाकीवरच ठेवली गिरणी; रोजगारासाठी शोधला नवा मार्ग

Video
Video Sakal

भारतात टॅलेंटला कमी नाही. गावागावात आपल्याला जुगाडू पोरं दिसतील. पण फक्त हे टॅलेंट समोर येण्यासाठी योग्य वेळी व्यासपीठ मिळत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका तरूणाने आपल्या रोजगारासाठी नवा शोध लावला आहे.

Video
Hindu-Muslim : मंदिरात नमाज पढणाऱ्या अकरमला अटक; म्हणाला, "मंदिर अन् मस्जिद माझ्यासाठी एकच"

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका तरूणाने थेट दुचाकीवर गिरण ठेवली असून घरोघरी जाऊन नागरिकांचे दळण दळून देण्याचे काम करत आहे. त्याने या शोधासहित रोजगाराचे नवे साधन तयार केले आहे. त्यामुळे या तरूणाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

अवनिश सरण या आयएएस अधिकाऱ्याने हा व्हिडिओ शेअर केला असून त्यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "माझ्या आईने हा व्हिडिओ मला पाठवला. हा तरूण माझ्या घरी आला होता. त्याच्यासोबत आटा चक्की मशीन होती." या मुलाने लावलेल्या शोधाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. नेटकऱ्या्ंनी या व्हिडिओवर आपल्या कमेंट केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com