Viral Video : कुत्र्याला शेजारी घेऊन ट्रेनमध्ये झोपली तरूणी; कुत्रा बघू लागला टकामका

हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral VideoSakal

अनेक लोकांना पाळीव प्राण्यांची आवड असते. कुत्रे किंवा मांजर आपल्या प्रत्येकाच्याच घरी असते. तर अनेकजण त्यांना सोबत घेऊन प्रवास करत असतात. सध्या अशाच एका तरूणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तीने ट्रेनच्या प्रवासात आपल्या सोबत कुत्रा नेल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Viral Video
हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरूणी कुत्र्याला सोबत घेऊन झोपली आहे. तर तिच्या अंथरूणात आतमध्ये एक कुत्रासुद्धा झोपला आहे. एक व्यक्ती तिला झोपेतून उठवत आहे. तर कुत्राही टकामका बघताना आपल्याला दिसत आहे. हा गोड कुत्रा पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून हा व्हिडिओ चांगलाच शेअक केला जात आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com