Viral : याला म्हणतात नशीब! अवघ्या 35 रूपयांत एका रात्रीत 'असं' बदललं तरूणाचं आयुष्य

सध्या या तरूणाची सोशल मीडियावर चर्चा आहे.
Viral
Viral Sakal

देव कधीतरीच देतो पण 'छप्पर फाडके...' असं आपण कित्येकदा ऐकलं असेल. कित्येक जणांचं आयुष्य एका रात्रीत बदललेल्या गोष्टीही आपण ऐकल्या असतील. तर अशा लोकांचं नशीब चांगलं आहे असंही आपण म्हणतो. अशाच एका तरूणाचं आयुष्य एका रात्रीत बदललं आहे. अरविंद सिंह कुशवाहा असं या तरूणाचं नाव असून या तरूणाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

हेही वाचा - T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

दरम्यान, अरविंद हा उत्तरप्रदेशमधील भाटपारराणीमधील रघुनाथपूर येथील रहिवाशी आहे. शुक्रवारी भारत आणि न्यूझीलंड दरम्यान झालेल्या पहिल्या टी२० सामन्याने त्याचे एका रात्रीत नशीब पालटले आहे. त्याने ड्रीम ११ हा खेळ खेळून अवघे ३५ रूपये लावून ७० लाख रूपयांचे बक्षीस जिंकले आहे. बक्षिस जिंकल्यानंतर परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून तेथील आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्षांनी त्याचे गावात येऊन स्वागत केले आहे.

त्याने रविवारी झालेल्या सामन्यात ड्रीम ११ वर ३५ रूपये लावले होते. त्याने या खेळात ९५१.५ अंकासह पहिली रँक प्राप्त केली आणि ७० लाखांचं बक्षीस जिंकलं. तर सामना संपल्यानंतर काहीच वेळात अरविंद यांच्या खात्यामध्ये टॅक्स कट होऊन ४९ लाख रूपये जमा झाले आहेत. तर ९५ लाख लोकांना मागे टाकून जिंकलेल्या बक्षीसामुळे त्याचे कौतुक केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com