

Child Rappelling Kokankada
esakal
Kokankada Rappelling Girl : महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगा, कडाकपारी आणि निसर्गसौंदर्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांना कायमच भुरळ घालत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पर्वतरांगांमधील किल्ले पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. पर्यटनासोबतच ट्रेकिंग आणि साहसी खेळांसाठी प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगडावरील कोकणकडा हे त्यातील एक प्रमुख आकर्षण आहे.