esakal | राष्ट्रवादीच्या बसमध्ये अनेक आमदार; पण धनंजय मुंडे...
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीच्या बसमध्ये अनेक आमदार; पण धनंजय मुंडे...

- राष्ट्रवादीच्या आमदारांना ही बस 'रेनिसन्स' हॉटेलमध्ये घेऊन आली

 

राष्ट्रवादीच्या बसमध्ये अनेक आमदार; पण धनंजय मुंडे...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे आमदार धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बसमध्ये बसले. आता ही बस राष्ट्रवादीच्या आमदारांना 'रेनिसन्स' हॉटेलमध्ये घेऊन आली आहे. आता या हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होणार आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

अजित पवार यांनी आज बंड करत भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर दक्ष झालेल्या राष्ट्रवादी पक्षाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये (वायबी सेंटर) दिवसभर बैठकांचा सपाटा लावला होता. अजित पवार यांच्याबरोबर गेलेले सहा आमदार दिवसभरात परत आले. सर्वांना उत्सुकता धनंजय मुंडे यांची होती. ते अजित पवार यांच्याबरोबर ठाम राहतील, अशी चर्चा होती. मात्र, सायंकाळी धनंजय मुंडेही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आले. ते पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत सहभागी झाले. 

अजित पवारांना राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही : शरद पवार

या बैठकीतच अजित पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी झाली. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांना एका बसमध्ये बसवण्यात आले होते. यातील महत्वाची बाब म्हणजे या बसमध्ये धनंजय मुंडेही बसले होते. त्यामुळे सद्यस्थितीत तरी ते पक्षाबरोबर ठाम असल्याचे दिसत आहे.