esakal | आम्हीच जिंकू; चंद्रकांतदादांनी सरकार कसं पडेल तेही सांगून टाकलं
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant-Patil-BJP

आम्हीच जिंकू; चंद्रकांतदादांनी सरकार कसं पडेल तेही सांगून टाकलं

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे आणि महाराष्ट्रातील पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पाेटनिवडणुकीचा निकाल आज (रविवार) जाहीर हाेत आहेत. या निकालांबाबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमांनी संवाद साधल्यानंतर त्यांनी पक्षाचे जास्ती जास्त उमेदवार निवडून येतील असा दावा करीत पंढरपूरची जागा आम्हीच जिंकू असा विश्वास व्यक्त केला.

चंद्रकांतदादांना पुण्यात शनिवारी माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाच राज्यांच्या आणि पंढरपूरच्या निकालाबाबत काही प्रश्न विचारले त्यावर दादा म्हणाले, ज्यांना नेहमीच दिसलं तरी सुद्धा साधारणतः काॅंग्रेसला आणि सत्तेत असणा-यांना बरे वाटण्याच काम दिले आहे. ते असेच काैल देणार संमिश्र वगैरे वगैरे. परंतु जवळ जवळ बहुतांश वाहिन्यांनी 177 पर्यंतचा आकडा भाजप पार करेल असे सांगत आहेत. आता काय हाेते ते पाहू. निवडणुकांचे निकाल हे शक्यतांवर असते असेही त्यांनी नमूद केले.

संजय राऊतांचा भाजपाला टोला

राज्यातील पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपने संपुर्ण मतदारसंघ पिंजून काढला हाेता. राष्ट्रवादीने माेठी यंत्रणा लावली हाेती. या निकालाबाबत आपल्याला काय वाटते यावर चंद्रकांतदादा म्हणाले. मी खूप लाेप्राेफाईल बाेलणारा माणूस आहे. पंढरपूरात आम्ही निश्चित जिंकू एवढंच सांगताे. आता पेट्या फुटल्यानंतर काय हाेतं ते पाहूच.

राज्यातील आॅपरेशन लाेटसचं काय यावर चंद्रकांतदादा म्हणाले आॅपरेशन लाेटसचं कधी विषयच नव्हता. वारंवार अमितभाई, देवेंद्रजी आणि मी आम्ही सर्वजण एकच मांडणी करीत आहाेत आपआपल्या संघषातून हे सरकार पडेल. पडल्यानंतर भक्कम पाेकळी निर्माण हाेईल. ही पाेकळी काेण भरुन काढणार हे काळ ठरवेल.

उत्कंठा शिगेला ! पोस्टल मतांनी मतमोजणीस सुरुवात