esakal | देशात सर्वाधिक मृत्यूदर असणारी महाराष्ट्रातील 5 शहरे
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patient

कोरोनाशी झगडणाऱ्या राज्यांचा विचार केला तर महानगरांना यावेळी संसर्गाचा जोरदार तडाखा बसला आहे. मुंबईमध्ये दिल्ली पाठोपाठ सर्वाधिक म्हणजे १२ हजारांहून जास्त मृत्यू झाले आहेत.

देशात सर्वाधिक मृत्यूदर असणारी महाराष्ट्रातील 5 शहरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- कोरोनाशी झगडणाऱ्या राज्यांचा विचार केला तर महानगरांना यावेळी संसर्गाचा जोरदार तडाखा बसला आहे. मुंबईमध्ये दिल्ली पाठोपाठ सर्वाधिक म्हणजे १२ हजारांहून जास्त मृत्यू झाले आहेत. सरकारी आकडेवारीचा आधार घेतला तर सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या देशातील १० शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि ठाणे ही ५ शहरे आहेत. मुंबईमध्ये तर मृत्यूमुखी पडणारे आणि दररोजचे नवीन संक्रमित यांची टक्केवारी देशात सर्वाधिक १.५ टक्के इतकी वाढलेली आहे.

मुंबईत आतापावेतो ६ लाख ३५ हजार कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी १२,९२० जणांचा मृत्यू झाला. पुण्यात आतापर्यंत ९ हजार ११४, ठाणे ६ हजार ६९२, नागपूर ४ हजार ९३२, नाशिक २ हजार ९५१ या शहरांमध्ये सर्वाधिक कोरोना बळी गेले असून, या सर्व शहरातील मृत्यूदर एक ते अडीच टक्क्यांपर्यंत वाढलेला आहे. देशात सध्या या संसर्ग घातकतेचा सरासरी दर म्हणजेच सीएफआर १.३ टक्के आहे. दिल्ली, चेन्नई, कोलकता, जयपूर, अहमदाबाद, नागपूर आणि मुंबईसारख्या १५ शहरांत हा दर १ ते अडीच टक्‍क्‍यांपर्यंतही वाढला आहे. देशात गेल्या चोवीस तासात सक्रिय रुग्णसंख्या ३.७९ लाखांपर्यंत वाढली आणि मृतांचा आकडा ३६४६ झाला. त्याचवेळी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या एका दिवसात २ लाख ७० हजारांपर्यंत विक्रमी वाढली आहे.

हेही वाचा: Corona Update: राज्यात दिवसभरात 61 हजार रुग्णांची कोरोनावर मात

दरम्यान, महाराष्ट्रात बुधवारी 24 तासांत 63 हजार 309 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 985 रुग्णांना विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 44 लाख 73 हजार 394 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी 61 हजार 181 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 83.4 टक्के आहे, तर मृत्यूदर 1.5 टक्के आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 6 लाख 73 हजार 481 सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने यासंदर्भातील माहिती दिली आहे