esakal | राज्यातल्या लसीकरणाला लागणार ब्रेक; कशी आहे परिस्थिती?
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination

राज्यातल्या लसीकरणाला लागणार ब्रेक; कशी आहे परिस्थिती?

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : कोरोनाचा विळखा वाढत असताना लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने पुढील काही दिवस राज्यातील लसीकरणाचा वेग मंदावण्याची शक्‍यता आहे. लसींचा साठा नसल्याने दोन दिवस केंद्रे बंद ठेवण्याची घोषणा मुंबई पालिकेने केली आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही या काळात लस मिळणार नाही. सोमवारी (3 मे) साठा मिळाल्यास लसीकरण सुरू होणार आहे.

राज्यात काही ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत आहे. पुढील साठा आल्यानंतरच तेथे लसीकरण सुरू राहू शकेल. नागपूर, नाशिक जिल्ह्यात मात्र लस उपलब्ध असल्याने मोहिमेत अडथळा येणार नसल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: आमदार निधीला आचारसंहितेचा अडथळा ! राज्याच्या तिजोरीत खडखडाट; चारऐवजी दोन कोटीच मिळणार

राज्यभरातील स्थिती

मुंबई

 • लसींचा साठा उपलब्ध नसल्याने रविवारपर्यंत (2 मे) सर्व लसीकरण केंद्रे बंद राहणार

 • ज्येष्ठ नागरिकांनाही लस मिळणार नाही

 • सोमवारी (3 मे) साठा मिळाल्यास लसीकरण सुरू होईल

 • 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी महानगरपालिकेने 227 केंद्रे उभारली, मात्र आता 2 मेपर्यंत साठा उपलब्ध होण्याची शक्‍यता कमी

 • लस नसल्याने पहिले दोन दिवस लसीकरण अशक्‍य

मराठवाडा

 • औरंगाबादमध्ये लसींचा साठा बुधवारी (ता. 28) दुपारीच संपला

 • महापालिकेतर्फे केवळ 60, घाटी रुग्णालयात शंभर जणांना लस; दीड लाख लसींची मागणी

 • नांदेडमध्ये सुरवातीच्या काळात लसीकरणाचा वेग 18 टक्के होता, आता लसीच्या तुटवड्यामुळे ही टक्केवारी आठवर.

 • हिंगोलीत केवळ शिल्लक दीड हजार लस एकच दिवस पुरेल. आणखी एक लाख 10 हजार लसींची मागणी

 • परभणीत कोव्हॅक्‍सिन लसीचा तुटवडा, आजपासून कोव्हिशिल्ड देणार

 • जालना जिल्ह्यात कोव्हिशिल्डचे 12 हजार डोस मिळाले. पुरेशा साठ्याची प्रतीक्षाच

 • लातूरमध्ये पंधरा दिवसांपासून पुरेसा साठा नाही, पाच हजार डोस मिळणार

 • उस्मानाबाद जिल्ह्यात आठ हजार डोस उपलब्ध; आठवड्याला सरासरी 22 ते 27 हजार डोस मिळत आहेत

पश्‍चिम महाराष्ट्र

 • कोल्हापूर जिल्ह्यास 35 हजार डोस आले

 • दिवसभरात 30 हजार व्यक्तींचे लसीकरण

 • लसीकरण आज (ता. 30) ठप्प होण्याची शक्‍यता

 • सांगली जिल्ह्यात 18 हजार 315 डोस शिल्लक; आज (शुक्रवारी) लसीकरण पूर्ण क्षमतेने होणार

 • सोलापूर शहर-जिल्ह्यातील सर्वच केंद्रे लसींअभावी दोन दिवसांपासून बंद

 • सातारा जिल्ह्यात 1 मे नंतर लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून 470 केंद्रे होणार

कोकण

 • रत्नागिरीत पुरेशा लसींअभावी लसीकरण आज (शुक्रवारी) ठप्प होणार

 • सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच हजार डोस शिल्लक

विदर्भ

 • नागपूर महापालिकेकडे सध्या लसींचा दोन दिवस पुरेल एवढा साठा उपलब्ध

 • चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख 39 हजार नागरिकांचे लसीकरण

 • कोव्हिशिल्डचे दोन लाख 32 हजार, तर कोव्हॅक्‍सिनचे सात हजार डोस आले होते

उत्तर महाराष्ट्र

 • नाशिक जिल्ह्यात आजअखेरपर्यंत सहा लाख 82 हजार 683 जणांनी घेतली लस

 • 95 हजार डोस शिल्लक

 • जळगाव जिल्ह्यात लसींचा तुटवडा; लसीकरण गुरुवारी ठप्प

 • नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा तोकडी असल्याने वेग मंदावला

 • धुळे जिल्ह्यात लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी

 • लसींचा कमी पुरवठा असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण