esakal | राज्यातील पर्यटकांचा जंगल सफारीकडे वाढता कल
sakal

बोलून बातमी शोधा

Tourist trends towards jungle safari

राज्यातील पर्यटकांचा कल आता निसर्गाच्या सानिध्यात जंगल सफारी करण्याकडे वाढलेला दिसत आहे. अगदी लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण निसर्गाच्या खुल्या हवेत, वन्यजीवांच्या सानिध्यात सुटी एन्जॉय करायला पसंती देत आहेत. 

राज्यातील पर्यटकांचा जंगल सफारीकडे वाढता कल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जागतिक वन्यजीव दिवस
पुणे - राज्यातील पर्यटकांचा कल आता निसर्गाच्या सानिध्यात जंगल सफारी करण्याकडे वाढलेला दिसत आहे. अगदी लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण निसर्गाच्या खुल्या हवेत, वन्यजीवांच्या सानिध्यात सुटी एन्जॉय करायला पसंती देत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पश्‍चिम महाराष्ट्र वन विभागाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये म्हणाले, ‘‘नागरिकांमध्ये निसर्ग पर्यटन वाढावे, यासाठी वन्य विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच वाघ पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने अभयारण्यात जातात. फक्त वाघावर लक्ष न देता जंगलात खूप गोष्टी बघण्यासारख्या आहेत.’’ 

हेही वाचा  : राज्यात उन्हाचा ताप वाढणार

जंगल सफारीमध्ये पर्यटकांना प्रत्येक प्राणी व पक्ष्यांबद्दल माहिती देण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामार्फत तरुणांना ‘गाइड’चे प्रशिक्षण देण्यात येते. तसेच वन्यजीव उद्यानांमध्ये पर्यटकांना फिरण्यासाठी रस्त्यांची चांगली सोय केली आहे.

निसर्ग पर्यटनामध्ये प्रत्येक वर्षी वाढ होत आहे. तसेच पर्यटकांच्या सोई-सुविधांवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. ही संख्या भविष्यात वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
- सत्यजित गुजर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक

फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर मध्य प्रदेश आणि देशातील इतर राज्यात असलेल्या वन्यजीव संग्रहालयांना भेट देण्यासाठी नागरिकांनी आतापासूनच बुकिंग सुरू केले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असोत किंवा साप्ताहिक सुट्टी, पर्यटक अशा जंगल सफारीचा आनंद घेण्यासाठी नेहमी तयार असतात.
- अनुज खरे, महाराष्ट्र राज्य निसर्ग पर्यटन मंडळाचे सदस्य   

पर्यटकांसाठी ‘होम स्टे’ योजना
वन विभागाच्या वतीने श्‍यामाप्रसाद मुखर्जी योजनेंतर्गत निसर्ग पर्यटनाला येणाऱ्या नागरिकांसाठी ‘होम स्टे’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात असलेल्या ग्रामीण वस्त्यांमध्ये या पर्यटकांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था केली जाते. यामुळे येथील ग्रामस्थांना आर्थिक उत्पन्नाचा पर्याय मिळतो. तसेच पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचे आनंद मिळतो.