esakal | Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

RAIN

Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे - मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रविवार पासून गुरुवारपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच राज्यासह शहर आणि परिसरात दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ४२.८ तर किमान तापमान पुणे येथे १७.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

मराठवाडा ते दक्षिण तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात बहुतेक ठिकाणी आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. मराठवाड्यावर चक्रिय चक्रवात आता विरून गेला असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. शनिवारी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचितशी वाढ पाहायला मिळाली, तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रातही कमाल तापमानात वाढ पाहायला मिळाली.

हेही वाचा: ब्राझील स्ट्रेनचा राज्यात शिरकाव: रत्नागिरीत आरटीपीसीआर अनिवार्य

पुणे शहर आणि परिसरात दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ होते. पुढील काही दिवस तरी अशीच स्थिती राहणार आहे. शनिवारी शहरातील किमान तापमान १७.४ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ३८.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.