
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात आयकर दरात बदल केल्यानं मध्यमवर्गियांना दिलासा मिळाला आहे. सात लाख रुपयांवरून १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न आता करमुक्त करण्यात आलंय. यामुळे आणखी एक कोटी लोकांना कर द्यावा लागणार नाही. पुढच्या आठवड्यात सादर केल्या जाणाऱ्या नव्या आयकर विधेयकाला स्थायी समितीकडे पाठवलं जाणार आहे अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.