Union Budget 2025 : भारतीय बनावटीची उपकरणे तयार करण्यासाठी मदत
Defence Sector : आत्मनिर्भरता आणि आधुनिकीकरणाच्या दृष्टीकोनातून यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आलेला आहे. संरक्षण क्षेत्रातील निधीची वाढ झाल्यामुळे भारतीय बनावटीच्या उपकरणांच्या निर्मितीसाठी मदत होईल, असे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.
पुणे : आत्मनिर्भरता व आधुनिकीकरण ही संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. त्यानुसार संरक्षण क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या निधीची तरतूद ही गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप जास्त वाढवली आहे, असे दिसत नाही.