Union Budget 2025 : करदात्यांना दिलासा; रोजगारनिर्मितीवर भर; बचतीत होणार वाढ, अर्थसंकल्पाबाबत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मत
Economic Budget : अर्थसंकल्पातील विविध क्षेत्रांसाठी केलेल्या भरीव तरतुदी आणि योजनांचा रोजगारनिर्मितीवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. १२ लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळाल्यामुळे करदात्यांची बचत वाढेल आणि ती बाजारात गुंतवली जाईल, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
पुणे : पर्यटन, उद्योग, शेती यांसह विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्पात केलेली भरीव तरतूद आणि योजना देशात रोजगार निर्मितीला चालना देणारी आहे. १२ लाख रुपयांपर्यंत कर सवलत दिल्याने करदात्यांची बचत होईल व ती रक्कम बाजारात गुंतवली जाणार आहे.