
पुणे : अर्थसंकल्पात सोन्यावरील तसेच चांदीवरील आयात शुल्क (इम्पोर्ट ड्यूटी) कपातीची घोषणा न झाल्याने सराफ व्यावसायिकांनी या अर्थसंकल्पाबाबत काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. तर, कच्च्या प्रकारातील सोन्याच्या संदर्भात केलेल्या तरतुदींबाबत समाधान व्यक्त केले आहे.