
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी मध्यमवर्गीयांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. आता 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना अनेक भेटवस्तू देण्यात आल्या आहेत. किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा आता 5 लाख रुपये करण्यात आली आहे. तर यात महाराष्ट्रासाठीही अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई आणि पुणे मेट्रोसाठी मोठी तरतूद करण्यात आल्याचे दिसून आले आहे.