असे अनेक प्रकल्प आहेत जे कायदेशीर अडचणी, आर्थिक संकट किंवा इतर कारणांमुळे अपूर्ण राहतात. या निधीमुळे त्या प्रकल्पांना पुनरुज्जीवित केले जाईल आणि घर खरेदीदारांना दिलासा मिळेल.
Modi Government 3.0 Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी २०२५ च्या अर्थसंकल्पात 'स्वामी फंड'ची (SWAMIH Fund) घोषणा केली आहे. या निधीचा उद्देश रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करणे आणि मध्यम आणि निम्न उत्पन्न गटातील लोकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणे आहे.