
नवी दिल्ली : ‘‘ यंदाचा अर्थसंकल्प देशाच्या विकास यात्रेचा महत्त्वाचा टप्पा आहे. भारतीयांचे स्वप्न पूर्ण करणारा आणि आर्थिक गतिमानतेसाठी पूरक असलेला हा अर्थसंकल्प बचत, गुंतवणूक आणि विकासाला चालना देणारा ठरेल,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले आहे.