
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (दि.1) संसदेत वर्ष 2021-22 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली : Union Budget 2021 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (दि.1) संसदेत वर्ष 2021-22 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अर्थमंत्री सीतारमण यांच्या भाषणात जीडीपी 37 महिन्यांच्या विक्रमी घसरणीचा उल्लेख नाही तसेच त्यांनी अर्थव्यवस्थेच्या गतीवर लक्ष दिले नसल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, अर्थमंत्र्यांच्या भाषणात याचा काहीच उल्लेख नाही. जीडीपीमध्ये 37 महिन्यांची घसरण झाली आहे. 1991 नंतरचे हे सर्वात मोठे संकट आहे. देशाची बहुमूल्य संपत्ती विकण्याशिवाय अर्थसंकल्पात विशेष लक्ष दिलेले नाही. अर्थव्यवस्थेला पुढे नेऊ नका, फक्त देशाची बहुमूल्य संपत्ती विका, असा टोलाही तिवारी यांनी लगावला.
FM’s Talkthorn oblivious that growth rate of GDP is in a record 37th month decline.Worst Crisis since 1991.
Except for a National Monetisation Plan - short hand for National Sell out no Central Focus in Budget.
Bottom line-Will not grow economy but sell the family silver.
— Manish Tewari (@ManishTewari) February 1, 2021
निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशाच्या पायाभूत सुविधा निर्मितीवर भर दिला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी 18 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देशात मार्च 2022 पर्यंत 8 हजार 500 किलोमीटर महामार्ग उभारणार आहे. खासगी गाड्यांची फिटनेस टेस्ट आता 20 वर्षांनंतर करण्यात येणार आहे. तसेच माल वाहतूक गाड्यांची फिटनेस टेस्ट 15 वर्षांनंतर करण्यात येईल. पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 675 किलोमीटर महामार्ग निर्मितीली मंजुरी देण्यात आली आहे. वायू प्रदूषणाचे आव्हान मोडून काढण्यासाठी 2 हजार 217 कोटी रुपये देण्यात आले आहे.
Budget 2021: FM निर्मला सीतारमण यांच्या बजेटमधील मोठ्या घोषणा; एका क्लिकवर
रेल्वे विभागासाठी 10 हजार 55 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, एनएचएआयचे टोल रोड, एअरपोर्ट संसाधनांना असेट मॉनेटायझेशन मॅनेजमेंटच्या अखत्यारित आणण्यात येईल. यंदा शेतीसाठी 16.5 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतीसाठी जी तरतूद केली त्यात गावागावातील बाजारपेठा आणि शहरांशी जोडले जाणार आहे.
Budget 2021: आरोग्य बजेटमध्ये तब्बल 137 टक्क्यांची वाढ; कोरोना लसीसाठी मोठा निर्णय
Edited By - Prashant Patil