esakal | Budget 2021: काँग्रेसचे लोकसभेत काळे गाऊन; कृषी कायद्यांना विरोध
sakal

बोलून बातमी शोधा

budget congress mp.jpg

दिल्लीतील सीमेशिवाय देशभरात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेडवेळी झालेल्या हिंसाचारामुळे या आंदोलनाला गालबोट लागले होते.

Budget 2021: काँग्रेसचे लोकसभेत काळे गाऊन; कृषी कायद्यांना विरोध

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन टीम

नवी दिल्ली- Union Budget 2021- अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे वर्ष 2021-22 चा अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. यादरम्यान, काँग्रेसचे खासदार जसबीर सिंग गिल आणि गुरजित सिंग औजला यांनी कृषी कायद्याच्या विरोधात काळ्या रंगाचा गाऊन परिधान करुन संसदेत प्रवेश केला. कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा प्रभाव यंदाच्या अर्थसंकल्पावरही पाहायला मिळू शकतो. त्यामुळेच सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न यंदाच्या अर्थसंकल्पात केला जाऊ शकतो. 

खासदार जसबीर सिंग गिल आणि गुरजित सिंग औजला यांनी आपल्या गळ्यात शेतकऱ्यांचे समर्थन करणारे फलकही घातले होते. मी शेतकरी आहे, मी मजूर आहे असा मजकूर फलकावर लिहिला होता. 

हेही वाचा- Union Budget 2021 - गाड्यांच्या स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा; ऑटोमोबाइल क्षेत्रात चैतन्य

यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांविषयी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नव्या कृषी कायद्यावरुन मोदी सरकारविरोधात संपूर्ण विरोधी पक्ष एकवटला आहे. दिल्लीतील सीमेशिवाय देशभरात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेडवेळी झालेल्या हिंसाचारामुळे या आंदोलनाला गालबोट लागले होते. लाल किल्ल्यावर आदोलकांनी घुसून तिथे झेंडा फडकवला होता. यावरुन देशभरात प्रतिकूल प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर दोन दिवस आंदोलक पिछाडीवर गेल्याचे दिसत होते. परंतु, शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या भावूक आवाहनानंतर पुन्हा शेतकरी एकवटले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत सरकार बोलायला तयार असल्याचे म्हटले. दरम्यान, अपेक्षेप्रमाणे अर्थसंकल्प सादर करताना विरोधकांनी सुरुवातीला घोषणाबाजी केली. 

हेही वाचा- Budget 2021 : "सरकारने बजेटमध्ये थापा मारू नये", संजय राऊतांनी सांगितल्या बजेटबाबतच्या अपेक्षा