Budget 2021 : "सरकारने बजेटमध्ये थापा मारू नये", संजय राऊतांनी सांगितल्या बजेटबाबतच्या अपेक्षा

Budget 2021 : "सरकारने बजेटमध्ये थापा मारू नये", संजय राऊतांनी सांगितल्या बजेटबाबतच्या अपेक्षा

मुंबई : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज वर्ष २०२१- २०२२ साठीचे आर्थिक बजेट सादर केलं. यापूर्वी शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी बजेटकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे माध्यमांना सांगितलं. GST च्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी केंद्रावर निशाणा साधला. 

संजय राऊत म्हणालेत... 

सरकारने बजेटमध्ये थापा मारू नयेत, देशाची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे. GDP चे वर खाली होणारे आकडे यांच्याशी सामान्य माणसाला काही घेणं देणं नाही. लॉकडाऊन काळात नागरिकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. लोकांना रोजगार हवाय. आजही नोकऱ्या गमावलेल्या नागरिकांची कुटुंब सावरू शकलेले नाहीत. लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्था आजही रुळावर येऊ शकलेली नाही. सरकारच्या २० हजार कोटींच्या घोषणा वगैरे बऱ्याच घोषणा असतात. पण त्या सामान्यानाच्या विझलेल्या चुली पेटवू शकल्या नाहीत. आजचं बजेट निर्मला सीतारामण वाचून दाखवतील. अन्न वस्त्र निवारा या ७५ वर्षांपासूनच्या समस्या आहेत. प्रत्येक बजेटमध्ये त्याबाबत चर्चा केली जाते. शेतकरी रस्त्यावर आहेत, या तीन कृषी कायद्यांमुळे देशातल्या काही मोजक्या भांडवलदारांचा फायदा होणार असेल असं शेतकऱ्यांना सांगणं असेल तर आजच्या बजेटचा फोकस शेकऱ्यांवर पडणार आहे का? हे पाहावं लागेल. 

महाराष्ट्र आणि मुंबईबाबत संजय राऊत म्हणालेत...

महाराष्ट्राला काय मिळेल, मुंबईला काय मिळेल, मुंबईतील रेल्वेसाठी काय देता येईल हे बजेट आल्यावर पाहूच. मात्र सरकारने गरिबांना जास्त गरीब करू नये अशी आमची अपेक्षा  काही चुकीची ठरू नये. 

union budget updates expectations of shivsena leader sanjay raut from budge 2021 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com