
या मिशनच्या अंतर्गत 4,378 अर्बन लोकल बॉडी पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यात येईल. 500 AMRIT शहरांत लिक्विड बेस्ड व्यवस्थापन करणे नियोजित आहे.
सरकारने 'जल जीवन मिशन'अंतर्गत 4,378 शहरी भागासाठी 2.87 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021-22 या अर्थिक वर्षातील अर्थसंकल्प सोमवारी संसदेत सादर केला. 2024 पर्यंत देशातील घरा-घरात पाणी पोहचवण्याचे ध्येय सरकारने आखले आहे. याच योजनेचा हा एक भाग आहे. मागील अर्थसंकल्पात सरकारने 11,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनेचा दाखलाही दिला. स्वच्छ पाणी, आणि स्वच्छता यावर जागतिक आरोग्य संघटना भर देत आहे. सामान्य माणसाच्या आरोग्याच्या अनुषंगाने जल-जीवन मिशनचे लॉन्चिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, असेही निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले.
Budget 2021: FM निर्मला सीतारमण यांच्या बजेटमधील मोठ्या घोषणा; एका क्लिकवर
या मिशनच्या अंतर्गत 4,378 अर्बन लोकल बॉडी पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यात येईल. 500 AMRIT शहरांत लिक्विड बेस्ड व्यवस्थापन करणे नियोजित आहे. 2.78 लाख कोटी रुपयात पुढील पाच वर्षात ही योजना लागू राहिल, असे अर्थमंत्री म्हणाल्या. जल -जीवन मिशन 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले होते. केंद्र सरकार या मोहिमेच्या अंतर्गत देशातील सर्व भागात स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचा उद्देश आहे. या योजनेत आगामी काही वर्षांत 3.60 लाख कोटी रुपये खर्च करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 2019-20 मध्ये निर्मला सीतारमन यांनी घराघरापर्यंत नळ योजनेची घोषणा केली होती. ही योजना जल जीवन मिशनचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.