Budget 2021 : काय स्वस्त, काय महाग? वाचा एका क्लिकवर

टीम ई सकाळ
Monday, 1 February 2021

आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला आहे. अर्थसंकल्पातून करदात्यांना कोणताच दिलासा मिळालेला नाही. तर 75 वर्षांवरील व्यक्तीच्या लोकांना रिटर्न भरावा लागणार नाही.

नवी दिल्ली - आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला आहे. अर्थसंकल्पातून करदात्यांना कोणताच दिलासा मिळालेला नाही. तर 75 वर्षांवरील व्यक्तीच्या लोकांना रिटर्न भरावा लागणार नाही. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लागू केला आहे. यामध्ये पेट्रोलवर अडीच तर डिझेलवर चार रुपयांचा अधिभार लागू केला आहे. याचा परिणाम ग्राहकांवर होणार नाही असं सांगितलं जात आहे. दरम्यान, अर्थसंकल्पामुळे काही वस्तू स्वस्त झाल्या तर काहींचे दर वाढले आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोबाइल उपकरणांवर कस्टम ड्युटी वाढवण्याची घोषणा केली. त्यांनी म्हटलं मोबाइल उपकरणांवरची कस्टम ड्युटी अडीच टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. तर कॉपर आणि स्टीलवरची कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. एवढंच नाही तर सोने आणि चांदीवरची कस्टम ड्युटी कमी केली आहे. यामुळे कॉपर, स्टीलच्या वस्तू स्वस्त होतील. तसंच सोने-चांदीचे दरही कमी होतील.

हे वाचा - Budget 2021: FM निर्मला सीतारमण यांच्या बजेटमधील मोठ्या घोषणा; एका क्लिकवर

काय होणार स्वस्त
कातड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या वस्तू
ड्राय क्लिनिंग होणार स्वस्त
लोखंडापासून तयार होणारी उत्पादने
रंग स्वस्त होणार
स्टीलची भांडी स्वस्त होतील
विमा
वीज
चपला
नायलॉन
सोने चांदी
पॉलिस्टर
तांबे धातूच्या वस्तू
शेती उपकरणे

Union Budget 2021 - गाड्यांच्या स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा; ऑटोमोबाइल क्षेत्रात चैतन्य 

महाग
मोबाइल आणि चार्जर महाग
सूती कपडे महागणार
इलेक्ट्रिक साहित्य
रत्ने महाग होणार
लेदरचे बूट महागणार
सोलर इन्व्हर्टर महाग होणार
फळे
युरिया
डीएपी खते
चना डाळ
पेट्रोल डिझेल महागणार
दारु महाग
ऑटो पार्ट्स

काय म्हणाले मोदी

केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभूतपूर्व काळात सादर झालेल्या बजेटचा 'प्रो अॅक्टिव्ह बजेट' अशा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. या छोट्याशा भाषणात त्यांनी अनेक गोष्टींवरही त्यांनी प्रकाश टाकला.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: union budget 2021 updates know what to be expensive and what cheap