
Union Budget 2022 : डिजिटल विद्यापीठात नेमकं काय असेल?
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर केला. यावेळी त्यांनी शिक्षण क्षेत्रातील सरकारच्या योजनांबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, कोविडमुळे शिक्षण (Education) क्षेत्राचं आणि विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान लक्षात घेऊन सरकार अनेक पावलं उचलत आहे. महामारीमध्ये शैक्षणिकदृष्ट्या झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी 1-क्लास-1-टीव्ही चॅनल सुरू करण्यात येणार आहे. ज्यामाध्यमातून मुलांना पूरक शिक्षण दिलं जाईल.
हेही वाचा: अर्थमंत्री जोरात, मनोरंजन इंडस्ट्री कोमात: निर्मात्यांच्या पदरी निराशाच
याशिवाय पंतप्रधान ई-विद्या प्रकल्पाचा आणखी विस्तार करण्यात येणार आहे. देशात डिजिटल शिक्षण आणि ई-लर्निंगला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने 2020 मध्ये हा प्रकल्प सुरू केला. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पीएम ई-विद्या 12 वरून 200 चॅनेलवर वाढवली जाईल. यामुळे कोरोनाच्या काळात शाळेत जाऊ न शकणाऱ्या मुलांना त्यांच्या अभ्यासात मदत होईल. इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा: Union Budget 2022: केंद्र सरकार पायभूत सुविधांवर खर्च करणार १०.६८ लाख कोटी रूपये
ते म्हणाले की, 'पीएम ई विद्या'च्या 'वन क्लास, वन टीव्ही चॅनल' कार्यक्रमाची संख्या वाढवण्यात येणार आहे. टीव्ही चॅनलवची संख्या 200 पर्यंत वाढवण्यात येणार आहे. यामुळे सर्व राज्यांतील शाळांना इयत्ता 1 ते 12 वी पर्यंत प्रादेशिक भाषांमध्ये पूरक शिक्षण देणे शक्य होईल. याशिवाय डिजिटल विद्यापीठाच्या निर्मितीचीही घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी म्हटलंय की, डिजिटल विद्यापीठ विविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल. तसंच ते अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल.
Web Title: Union Budget 2022 What Exactly Will Be In A Digital University Nirmala Sitharaman
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..