"इंडिया पोस्टला १.५ लाख ग्रामीण पोस्ट ऑफिससह एका मोठ्या सार्वजनिक लॉजिस्टिक्स संघटनेत रूपांतरित केले जाईल, जे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी फायद्याचे ठरेल."
सरकार भारतीय टपाल विभागाला १.५ लाख ग्रामीण टपाल कार्यालयांसह एका मोठ्या लॉजिस्टिक संघटनेत रूपांतरित करण्याची योजना आखत आहे. सलग आठवा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) म्हणाल्या की, इंडिया पोस्टला १.५ लाख ग्रामीण पोस्ट ऑफिससह एका मोठ्या सार्वजनिक लॉजिस्टिक्स संघटनेत रूपांतरित केले जाईल, जे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी फायद्याचे ठरेल.