
नवी दिल्ली : विकसित भारताची पायाभरणी करत गरीब, युवक, अन्नदाता अर्थात शेतकरी आणि नारीशक्तीला आधार देणारा तसेच आर्थिक चक्र गतिमान करणारा पन्नास लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेच्या पटलावर मांडला. नोकरदार अन् मध्यमवर्गीयांसाठी सरकारने तिजोरी खुली करताना वार्षिक बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. कृषी क्षेत्र, लघू, सुक्ष्म अन् मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि स्टार्टअपला आर्थिक बूस्टर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) विकासाला चालना देण्यात आली असून केंद्र सरकार याकामी पाचशे कोटी रुपये खर्च करणार आहे.