- अमिताभ पावडे, धंतोली, नागपूर
सात हजार वर्षांपासून भारतात शेतकरी शेती करतो आहे. आजही जर किसान सन्मान निधी किंवा किसान क्रेडिट कार्ड किंवा कृषी कर्जावर भांडवल उभारत असेल तर आपली अर्थसंकल्प व अर्थव्यवस्था किती कुचकामी आहे, हे कळते!
केंद्रीय अर्थसंकल्पाकडे समस्त कृषीव्यवस्था आशा आणि अपेक्षेने पाहात होती. मात्र, अर्थसंकल्पात कृषिक्षेत्र दुर्लक्षित राहिले. वस्तुतः कृषी कर्जमाफी, व किसान सन्माननिधीची निधीवाढ वगैरे विषयांची चर्चा अगदी जोमात होत्या. गेल्या दहा वर्षात १६.६० लाख कोटी रुपयांची कर्जे निर्लेखित केल्यावर एरवी अतार्किक वाटणाऱ्या कृषी कर्जमाफीला देखील तार्किक आधार मिळाला होता.