
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मुंबई आणि पुण्यातील मेट्रोसह मुंबई-अहमदाबाद बुलेट रेल्वे प्रकल्पासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याशिवाय, मुंबई शहर वाहतूक प्रकल्पाचाही उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय मुळा-मुठा नदी संवर्धन आणि नागनदी सुधार प्रकल्पासाठी तरतूद करण्यात आली आहे.