esakal | Budget 2021: 'ब्रेक्स दुरुस्त करता येत नाहीत म्हणून हॉर्न मोठा करायचा प्रकार' - शशी थरुर
sakal

बोलून बातमी शोधा

shashi tharoor.

काँग्रेस नेते शशी थरुर यांनी एका उदाहरणाद्वारे हे बजेट पोकळ असल्याचं दाखवून दिलंय.

Budget 2021: 'ब्रेक्स दुरुस्त करता येत नाहीत म्हणून हॉर्न मोठा करायचा प्रकार' - शशी थरुर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

Union Budget 2021: निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थमंत्री म्हणून तिसऱ्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यामध्ये आयकरात सूट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अशी कोणतीच घोषणा त्यांनी केली नाही. दुसरीकडे वृद्धांना दिलासा मिळाला असून 75 वर्षांवरील व्यक्तींसाठी करात सूट देण्यात येणार आहे. 75 वर्षांवरील पेन्शनधारकांना आयकर रिटर्न भरावा लागणार नाही. कोरोनाच्या आधीच अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली होती. या कंबरडं मोडलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकार काय उपाययोजना करतंय, याकडे देशाचं लक्ष लागलं होतं. सरकार कोरोनाची लस मोफत देईल का, याकडेही देशाचं लक्ष लागलं होतं मात्र, त्याबाबतची घोषणा सरकारकडून करण्यात आली नाहीये. मात्र 35 हजार कोटींची तरतूद सरकारकडून करण्यात आली आहे. 

हेही वाचा - Budget 2021 : देशाची संपत्ती भांडवलदारांच्या हातात सोपवण्याचा कट; राहुल गांधींची टीका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी या बजेटवर खोचक अशी टीका केली आहे. त्यांनी एका उदाहरणाद्वारे हे बजेट पोकळ असल्याचं दाखवून दिलंय. त्यांनी ट्विट करत म्हटलंय की, भाजप सरकारने मला एका गॅरेज मेकॅनिकची आठवण करुन दिली आहे. जो गॅरेज मेकॅनिक आपल्या ग्राहकांना  म्हणतो की, मी तुमच्या गाडीचे बिघडलेले ब्रेक्स दुरुस्त करु शकत नाही, म्हणून मी तुमच्या गाडीचा हॉर्न अधिक मोठा आवाज करेल अशापद्धतीने दुरुस्त करतो. 

या बजेटवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी टीकेची झोड उठवली आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवर ट्विट करत म्हटलंय की, सामान्य लोकांच्या हातात पैसे आणण्याऐवजी मोदी सरकारने भारताची मालमत्ता त्यांच्या उन्मत्त भांडवलशाहीवादी मित्रांच्या हातात देण्याची योजना आखली आहे. आज सकाळीच राहुल गांधी यांनी ट्विटरवर या बजेटकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यांनी ट्विटरवर तीन मुद्दे टाकले होते. MSME ला पाठिंबा, शेतकरी आणि कामगारांसाठी रोजगार हवा. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आरोग्य क्षेत्रावर अधिक तरतूद व्हायला हवी. सीमेच्या सुरक्षेसाठी संरक्षण क्षेत्रावरील खर्चामध्ये वाढ करण्यात यायला हवी. 

loading image