Budget 2021: रेल्वेचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी बजेटमध्ये मोठ्या घोषणा

railway
railway

नवी दिल्ली- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्षे 2021-22 चे सर्वसाधारण बजेट सादर केले. कोरोना संकटातून जात असलेल्या भारतासाठी यंदाचे बजेट खास होते. या बजेटमध्ये कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात येतील याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. बजेटमध्ये अनेक क्षेत्रांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रेल्वे सेक्टरसाठी कोणत्या घोषणा केल्या ते बघुया...

रेल्वे सेक्टरसाठी 10 हजार 55 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. निर्मला सीतारमण म्हणाल्या की, रेल्वे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, एनएचएआयचे 
टोल रोड, एअरपोर्ट संसाधनांना असेट मॉनेटायझेशन मॅनेजमेंटच्या अखत्यारित आणण्यात येईल. अर्थमंत्री म्हणाल्या की, 4.21 लाख कोटी रुपये कॅपिटल एक्सपेंडीचरला देण्यात आले. 4.39 लाख कोटी रुपये खर्च झाले. पुढील वर्षासाठी 5.54 लाख कोटी रुपयांची तरतूद आहे. 

BUDGET 2021 Agriculture: शेतीक्षेत्रासाठी 16.5 लाख कोटींची तरतूद, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणार

महाराष्ट्रातील मेट्रोसाठीही बजेटमध्ये मोठी घोषणा करण्यात आली आहे. नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटी रुपयांची तर नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 976 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. 

नॅशनल रेल्वे प्लॅनमुळे हदलणार रेल्वेचा चेहरा-मोहरा

अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, रेल्वे प्लॅन 2030 तयार आहे. याद्वारे फ्यूचर रेडी रेल्वे सिस्टम बनवण्याचे लक्ष्य आहे. मेक इंडियावर आपल्या सरकारचे फोकस आहे. इस्टर्न आणि वेस्टर्न फ्रेट कॉरिडोर जून, 2022 पर्यंत तयार होईल. अर्थमंत्री म्हणाल्या की, सोन नगर- गोमो सेक्शन पीपीपी मोडद्वारे विकसित केला जाईल. 

अर्थमंत्र्यांनी म्हटलं की, ईस्ट कोस्ट कॉरिडोर खडगपूर-विजयवाडा, इटारसी-विजयवाडा कॉरिडोर बनवलं जाईल. सध्या ब्रॉड गेज- इलेक्ट्रिफाईड रेल्वे लाईनची लांबी 46 हजार किमोमीटर आहे. 2023 पर्यंत 100 टक्के इलेक्ट्रिफिकेशन करण्यात येईल. 

प्रवासी रुटवर लागणार एलएचबी कोच

एलएचबी कोच टूरिस्ट रूटवर करण्यात येईल. ही आरामदायक सुविधा आहे. हाय डेंसिटी नेटवर्कमध्ये स्वदेशी प्रोटेक्शन सिस्टम लावण्यात येईल. निर्मला सीतारमण म्हणाल्या की, मालवाहू मार्गावर  DFCC विशेष लक्ष देण्यात येईल. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com