
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना जल जीवन मिशन योजनेचा विस्तार २०२८ पर्यंत करण्याची घोषणा केली. त्यांनी संसदेत सांगितले की, भारतातील १५ कोटी कुटुंबांना या योजनेंतर्गत नळाद्वारे शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे. मात्र, योजनेचे आधीचे अनेक प्रलंबित प्रकल्प पूर्ण न झाल्याने मराठवाड्यात या पाण्यासाठी आवाज उठवला जात आहे.