दुधातून 'हे' पदार्थ घ्याल तर इम्युनिटी वाढणार झटपट...आहारतज्ज्ञ सांगतात..

dry-fruits-milkshake.jpg
dry-fruits-milkshake.jpg
Updated on

नाशिक : कोरोनापासून दूर राहण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्या शिवाय पर्याय नाही. उपवास केल्याने शरीरातील कॉर्टिसोल हार्मोन्सचे प्रमाण वाढते व रोगप्रतिकारशक्ती कमी होते तर शरीराचे स्नायूदेखील कमजोर होतात. इन्फेकशन झाल्यास शरीरातील प्रतिकार करण्यासाठी जास्त कॅलरीजची आवश्यकता असते म्हणून समतोल व पौष्टिक आहार सध्याच्या काळात घेणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी  आहारतज्ञांचा सल्ला... 

रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास याची होते मदत...

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ताज्या व स्वच्छ धुतलेल्या भाज्या, फळे, कडधान्ये, पनीर, दुग्धजन्य पदार्थ, आंबट फळे (व्हिटॅमिन 'सी' युक्त) आवळा, लिंबू, संत्री, किवी, पेरू, डाळिंब या फळांचे सेवन करायला हवे. पपई या फळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन 'सी' व व्हिटॅमिन 'ए' युक्त व अँटिऑक्सिडंट असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास चांगली मदत होते. लसणात अँटिव्हायरल प्रोटीन असल्याने लसूण पाकळी ठेचून मधाबरोबर घेणे उपयुक्त ठरते. आले हे सूज कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते म्हणून सर्दी-खोकला व श्वसनक्रियेशी निगडित आजार रोखण्यास मदत होते. नियमित आहारात पालक व ब्रोकोलीचा समावेश करावा. 

हलका व नियमितपणे व्यायाम व योगा...

नऊ ते दहा तास झोप घेणे व रात्री झोपल्यानंतर रोगप्रतिकारसंस्था दुरुस्त म्हणजेच पूर्ववत होत असते. तसेच हलका व नियमितपणे व्यायाम व योगा करावा. ग्रीन टीमधील फायटोकेमिकल्स, पॉलिफेनॉल, इन्झायमी आणि अमिनो ॲसिड असल्याने चयापचयाचे कार्य सुधारते. 

उकळलेले पाणी प्यावे 

सकाळी उठल्याबरोबर व रात्री झोपताना उकळलेले पाणी प्यावे. फ्रीज अथवा माठातील पाणी टाळावे. सकाळी तासभर पाच ते सहा किलोमीटर चालावे. चालण्याआधी ग्लासभर कोमट पाणी आणि आल्यानंतर बिनसाखरेचे एक कप लेमन टी पिऊ शकतात. 

पावसाळ्यात शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता, अंजीर, मनुके, बेदाणे खावेत. सुक्यामेव्यात व्हिटामिन असतात, जी शरीराची झीज भरून काढतात. रोज खाण्याचा कंटाळा येत असेल, तर तव्यावर एक चमचा तूप टाकून त्यावर हे सर्व जिन्नस भाजून घ्यावेत. नंतर त्यांची पूड बनवून ती दुधात टाकून प्यावी. त्यातून रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते. - सोनाली हटकर, डाएट मॅटर्स क्लिनिक 

रिपोर्टर : भाग्यश्री गुरव

(संपादन - किशोरी वाघ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com