esakal | नाशिकला पवार साहेब आल्यानंतर सांगणार काय? कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था केविलवाणी.. तर मनसे कोमात!
sakal

बोलून बातमी शोधा

pawar shard.jpg

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर येत असताना कोरोना लढाईत आम्ही काय केले? याचे उत्तर देण्यासाठी आकड्यांची जमवाजमव सुरु झाली असली तरी ते आकडे मिळविताना देखील पदाधिकाऱ्यांची दमछाक होताना दिसतं आहे. तर मरगळलेल्या कॉंग्रेसला नेतृत्वाअभावी या आपत्तीच्या काळात काय केले पाहिजे? याबाबत सुचतं नसल्याने कोरोना आपत्तीच्या काळात दोन्ही पक्षांची अवस्था केविलवाणी झाली आहे.

नाशिकला पवार साहेब आल्यानंतर सांगणार काय? कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था केविलवाणी.. तर मनसे कोमात!

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

नाशिक : शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना भाजप व शिवसेना संपुर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. परंतू आता पर्यंत सत्तेच्या माध्यमातून शहरात एकहाती सत्ता असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस अद्यापही कोमात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर येत असताना कोरोना लढाईत आम्ही काय केले? याचे उत्तर देण्यासाठी आकड्यांची जमवाजमव सुरु झाली असली तरी ते आकडे मिळविताना देखील पदाधिकाऱ्यांची दमछाक होताना दिसतं आहे. तर मरगळलेल्या कॉंग्रेसला नेतृत्वाअभावी या आपत्तीच्या काळात काय केले पाहिजे? याबाबत सुचतं नसल्याने कोरोना आपत्तीच्या काळात दोन्ही पक्षांची अवस्था केविलवाणी झाली आहे.

हे पक्ष कागदावर तरी आहे का? असा प्रश्न आता उपस्थित
सत्तेच्या लढाईमध्ये राजकीय पक्षांना नागरिकांकडून मतांची अपेक्षा असली तरी आपत्तीच्या काळात प्रशासनाबरोबरचं राजकीय पक्षांनी देखील मदतीला धावून गेले पाहिजे अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. सध्या शहर कोरोनाच्या आपत्तीला तोंड देत असताना मदतीची अपेक्षा प्रत्येक नाशिककर करतं आहे. कोरोना काळात टेस्ट वाढविणे महत्वाचे असल्याने प्रशासनच्या मदतीला भाजपसह शिवसेना देखील धावून गेले. शिवसेनेने स्वखर्चाने टेस्टींग सुरु केल्या तर भाजपने आज पासून नगरसेवकांच्या माध्यमातून तपासणी सुरु केल्याने कोरोनाच्या लढ्याला चांगले बळ मिळाले आहे. परंतू यानिमित्ताने आता पर्यंत गल्लीपासून दिल्ली पर्यंतच्या सत्तेत सहभागी असलेला कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस कुठेचं दिसंत नसल्याने हे पक्ष कागदावर तरी आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

राष्ट्रवादीचा ताप वाढला

राष्टवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची आपत्तीच्या काळात धावून येण्याचा स्वभाव अख्या महाराष्ट्राला माहित आहे. दुष्काळ, भुकंप असो कि मुंबईत झालेले बॉम्बस्फोट या काळात खासदार पवार यांनी हाताळलेली परिस्थिती सर्वांनाचं माहित असल्याने अनेकदा त्यांच्या समोर राजकीय भुकंप करण्याची देखील कोणी हिंमत करतं नाही. तेच पवार येत्या शुक्रवारी नाशिक मधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नाशिक मध्ये येत असताना त्यांच्या समोर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकायांनी नागरिकांना काय मदत केली याची माहिती देण्यासारखी परिस्थिती नसल्याने सर्वसामान्य पक्ष कार्यकर्ता मात्र चिंतेत आहे. नगररसेविका सुषमा पगारे, समिना मेमन या दोन महिला नगरसेवकांनी एका बाजुने छोट्या स्वरुपात का होईना राष्ट्रवादीचा किल्ला लढविला असला तरी ज्यांच्याकडून नागरिकांना तपासणीसाठी बाहेर काढण्याची अपेक्षा आहे ते स्वताला बाहुबली समजणारे नगरसेवक घरातचं बसून असल्याने राष्ट्रवादीचा ताप वाढला आहे.

हेही वाचा > कोरोना पार्श्‍वभूमीवर शरद पवारांचा शुक्रवारी नाशिक दौरा... होणार विविध घटकांशी चर्चा 

मनसेचा लढाऊ बाणा गेला कुठे?
महापालिकेत पाच वर्षे सत्तेत काढलेल्या मनसेकडे कार्यकर्त्यांचे जाळे असताना प्रमुख पदाधिकारी घरात बसून आहे. दुय्यम फळीतील पदाधिकायांना योग्य मार्गदर्शन नसल्याने कधी महापारौंना च्यवनप्राश भेट देवून तर कधी आरती करण्यातचं त्यांनी धन्यता मानली आहे. वास्तविक आपत्तीचा सामना करण्याची वेळ असताना आंदोलनाच्या माध्यमातून चमकोगिरी करण्यात धन्यता मानतं असल्याने पक्षाकडे अजेंडा नसल्याची चर्चा नाशिककरांमध्ये आहे.

रिपोर्टर - विक्रांत मते

(संपादन - ज्योती देवरे)

हेही वाचा > "मालेगावची ही पत्थे आत्मसात केली ..तर कोरोना दूर पळालाच म्हणून समजा..!"