जिल्ह्यातील एक लाख गरोदर मातांना ‘मातृ वंदन'; आरोग्यासोबत आर्थिक मदतही

pregnant_mother_hvac.jpg
pregnant_mother_hvac.jpg

नाशिक : बाळंतपण म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्मच. याकाळात स्त्रीला आराम व सकस आहाराची गरज असते. परंतू रोजीरोटीसाठी रोजंदारी, मोलमजुरी करणाऱ्या गरोदर मातांना या काळात काम करावे लागू नये तसेच त्यांचे आर्थिक नुकसान देखील होऊ नये यासाठी राबविण्यातय येत असलेल्या ‘मातृ वंदन’ या योजनेतर्गंत जिल्ह्यातील सुमारे १ लाख १९ हजार मातांना आर्थिक लाभ थेट त्याच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. 

जवळपास ८६ टक्के मातांना आर्थिक लाभ

जिल्ह्यातील रोजंदारी, मोलमजुरी करणाऱ्या स्त्रियांना ‘मातृ वंदन’ या योजनेचा लाभ झाला आहे. गरोदरपणात जास्तीची मेहनतीची कामे होऊ नये. तसेच त्यांचे आर्थिक नुकसानही होऊ नये, यासाठी ही योजना राबविली जात आहे. गरोदरपणात माता व बालक परिस्थितीमुळे कुपोषित होऊ नये यासाठी मातृ वंदन योजना राबविली जात आहे. नाशिक जिल्ह्यात १ लाख १९ हजार ४९७ म्हणजेच जवळपास ८६ टक्के मातांना आर्थिक लाभ देण्यात आलेला आहे. गरोदर मातांना बाळाच्या जन्मापर्यंतच्या कालावधती टप्प्याटप्याने पाच हजार रूपये इतके अर्थसहाय्य केले जाते. गरोदर मातांप्रमाणेच स्तनदा मातांसाठी देखील ‘जननी शिशू सुरक्षा योजना’ राबविली जाते. त्यानुसार गरोदार मातांची रूग्णालयात प्रसूती होण्याला प्राधान्य देण्याबरोबरच माता आणि बालक यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी योजनेचा लाभ महिलांना दिला जातो.

जिल्ह्यात ग्रामीण तसेच अदिवासी भागातील महिलांसाठी या योजना लाभदायक ठरत आहे. या योजनांचा लाभ घेण्याविषयीच जनजागृती झाल्याचे देखील लाभार्थ्यांच्या संख्येवरून दिसून येते. महिलांची सुरक्षितेविषयी देखील यामुळे कुटूंबियांमध्ये जागृती होत असल्याचे दिसते. सुरक्षित प्रसूतीसाठी मातांना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण देखील वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. त्यानुसार जिल्ह्यात स्तनदा माता आणि शुन्य ते एक वयोगटातील बालक अशा ९१ टक्के गरोदर मातांना मोफत संदर्भ सेवा देण्यात आलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com