Corona Update : नाशिक जिल्ह्यात दिवसभरात १ हजार ४९५ बाधित, १८ रूग्‍णांचा मृत्‍यू 

अरुण मलाणी
Sunday, 20 September 2020

रविवारी कोरोनामुक्‍त झालेल्‍यांमध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक १ हजार २८४ रूग्‍ण नाशिक शहरातील आहेत. तर नाशिक ग्रामीणचे ६२०, मालेगावचे २२ आणि जिल्‍हाबाह्य चौदा रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे.

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून नव्‍याने आढळणार्या कोरोना बाधितांच्‍या तुलनेत बरे होणार्या रूग्‍णांचे प्रमाण अधिक राहात असल्‍याने, सध्याच्‍या उपचार घेत असलेल्‍या कोरोना बाधितांचा आकडा घटला आहे. रविवारी (ता.२०) दिवसभरात १ हजार ४९५ बाधित आढळून आले, तर १ हजार ९४० रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. अठरा रूग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. यातून ॲक्‍टीव्‍ह रूग्‍णांची संख्या ४६३ ने घटली असून, सद्यस्‍थितीत ९ हजार ६२८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. अनेक दिवसांत प्रथमच हा आकडा दहा हजारांच्‍या आत आला आहे. 

नाशिक शहरात सर्वाधिक कोरोनामुक्‍त

रविवारी कोरोनामुक्‍त झालेल्‍यांमध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक १ हजार २८४ रूग्‍ण नाशिक शहरातील आहेत. तर नाशिक ग्रामीणचे ६२०, मालेगावचे २२ आणि जिल्‍हाबाह्य चौदा रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील १ हजार ०४५, नाशिक ग्रामीणचे ३९३, मालेगावचे ४०, जिल्‍हाबाह्य १७ रूग्‍णांचा समावेश आहे. अठरा मृत्‍यूंमध्ये प्रत्‍येकी सहा नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि मालेगाव महापालिका हद्दीतील रूग्‍ण आहेत. यातून जिल्‍ह्‍यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा ६४ हजार ००२ वर पोहोचला आहे. यापैकी ५३ हजार २०१ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १ हजार १७३ रूग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. सद्य स्‍थितीत ९ हजार ६२८ रूग्‍णांवर उपचार सुरू आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ३८१ अहवाल प्रलंबित होते. यापैकी ८४२ अहवाल नाशिक ग्रामीणचे आहेत. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

आज दाखल झालेले संशयित

दिवसभरात नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १ हजार ९४३ संशयित, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात शंभर रूग्‍ण, मालेगाव महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ३५, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात १९, जिल्‍हा रूग्‍णालयात सात संशयित दाखल झाले होते.  

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

 

संपदन - रोहित कणसे

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 thousand 495 new corona patients found in nashik district marathi news