esakal | धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश
sakal

बोलून बातमी शोधा

25civil-hospital.jpg

जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी (ता. 12) धक्कादायक घटना घडली. पंचवीस वर्षीय युवकाने रुग्णालयात आत्महत्या केली. तब्येतीत सुधारणा झाली असून देखील त्याने घेतलेल्या निर्णयाचे आश्चर्य व्यक्त होत आहे. वाचा काय घडले?

धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : (जुने नाशिक) जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी (ता. 12) धक्कादायक घटना घडली. पंचवीस वर्षीय युवकाने रुग्णालयात आत्महत्या केली. तब्येतीत सुधारणा झाली असून देखील त्याने घेतलेल्या निर्णयाचे आश्चर्य व्यक्त होत आहे. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी (ता. १२) सायंकाळी धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सचिन दादाजी सोनवणे (वय २५, रा. मुसळगाव, ता सिन्नर) या रुग्णाने रुग्णालयातील शौचालयात गळफास घेत आत्महत्या केली. त्याला उलट्या होत असल्याने पुरुष वैद्यकीय विभागात उपचार सुरू होते. दोन दिवसांपासून त्याला उलट्यांचा त्रास होत असल्याने शुक्रवारी (ता. ११) रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली. शनिवारी त्याला रुग्णालयातून सोडले जाणार होते. तत्पूर्वी त्याने कक्षातील बेडवरची चादर घेऊन शौचालयात जाऊन गळफास घेतला. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

जिल्हा रुग्णालयात भीतीचे वातावरण

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. आजारपणास कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. सरकारवाडा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. रुग्णाच्या आत्महत्येच्या प्रकाराने जिल्हा रुग्णालयाच्या आवारात मात्र भीतीचे वातावरण होते. सरकारवाडा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.  

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

संपादन - किशोरी वाघ

go to top