जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

chorchavdi waterfall.jpg
chorchavdi waterfall.jpg

नाशिक / दहीवड : रविवारी पर्यटनासाठी वडाळीभोई (ता. चांदवड) येथील पाच युवक पर्यटनासाठी दहीवड (ता. देवळा) परिसरातील चोरचावडी धबधबा येथे आले होते. एकमेकांचे जिवलग असलेले हे पाच जण धबधब्यात पोहण्यासाठी उतरले सुध्दा..पण त्यानंतर जे काही घडले त्यामुळे प्रशासनाची भूमिका मात्र संशयाच्या फेऱ्यात आहे.

बंदी असताना प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

रविवारी पर्यटनासाठी वडाळीभोई (ता. चांदवड) येथील अजिंक्य जाधव, संकेत जाधव, सागर जाधव, शुभम गुजर व हृषीकेश तोटे हे पाच युवक पर्यटनासाठी दहीवड (ता. देवळा) परिसरातील चोरचावडी धबधबा येथे आले होते. एकमेकांचे जिवलग असलेले हे पाच जण धबधब्यात पोहण्यासाठी उतरले. एका बाजूला तीन, तर दुसऱ्या बाजूला दोन अशा प्रकारे पोहत होते. पाण्याची पातळी जास्त असल्याने पाण्यात ते बुडू लागले. त्यातील अजिंक्य, संकेत, सागर तिघांना बऱ्यापैकी पोहता येत असल्याने ते पाण्यातून कसेबसे वर आले. मात्र शुभम व हृषीकेश या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते जागीच बुडाले.

दोन्ही मित्र एकमेकांच्या मिठीत एकमेकांचा बचाव

ग्रामस्थांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना कळविले. पोलिसांनी पाण्यात बुडालेल्या युवकांच्या मृतदेहांचा शोध घेण्यासाठी पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलविले. तेव्हा दोन्ही मित्र एकमेकांच्या मिठीत एकमेकांच्या बचाव करण्यासाठी प्रयत्न करत असावेत असे पोहणाऱ्यांना आढळून आले. दोघांचे मृतदेह वर काढण्यात आले. मृतदेह वर काढून दोन किलोमीटरपर्यंत उचलून नेत विच्छेदनासाठी देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. 
देवळा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय मातोंडकर, शिपाई भामरे, मल्ले, सुदर्शन गायकवाड, सुनील गांगुर्डे, फसाले तपास करीत आहेत. 


चोरचावडी धबधबा चिंतेची बाब 
चोरचावडी धबधब्याकडे जाण्यासाठी नीटनेटका रस्ता नाही. तसेच धबधब्यालगत पर्यटकांना जागेचे गांभीर्य निर्माण करून देणाऱ्या आवश्यक सूचनांचा साधा सूचनाफलकही नाही. तरी या ठिकाणी दिवसेंदिवस वाढणारी पर्यटकांची वर्दळ ही चिंतेची बाब बनली आहे. 

पर्यटनस्थळांवर बंदी असली तरी ती नावालाच

येथील गुरदड परिसरातील चोरचावडी धबधबा परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पाच मित्रांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवारी (ता. १३) दुपारी दोनच्या सुमारास घडली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळांवर बंदी असली तरी ती नावालाच असल्याचा प्रत्यय आजच्या घटनेतून पुन्हा आला आहे. 

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com