जिल्‍ह्‍यात दिवसभरात १ हजार ५३५ कोरोना बाधित; तर १३ रुग्णांचा मृत्‍यू 

अरुण मलाणी
Friday, 18 September 2020

शुक्रवारी आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील १ हजार १५२ रूग्‍ण असून, नाशिक ग्रामीणचे ३२४, मालेगावचे ४५ तर जिल्‍हाबाह्य १४ रूग्‍णांचा समावेश आहे. बरे झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ९८८, नाशिक ग्रामीणचे ४५०, मालेगावचे ४६ तर जिल्‍हाबाह्य बारा रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे.

नाशिक : जिल्‍ह्‍यातील एकूण कोरोना बाधितांच्‍या आकड्याने साठ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारी (ता.१८) दिवसभरात १ हजार ५३५ कोरोना बाधित आढळून आले. तर १ हजार ४९६ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. तेरा रूग्‍णांचा मृत्‍यू झाला असून, यातून ॲक्‍टीव्‍ह रूग्‍णसंख्येत २६ ने वाढ झाली आहे. 

नाशिक शहरातील १ हजार १५२ रूग्‍ण

शुक्रवारी आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील १ हजार १५२ रूग्‍ण असून, नाशिक ग्रामीणचे ३२४, मालेगावचे ४५ तर जिल्‍हाबाह्य १४ रूग्‍णांचा समावेश आहे. बरे झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ९८८, नाशिक ग्रामीणचे ४५०, मालेगावचे ४६ तर जिल्‍हाबाह्य बारा रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. तेरा मृतांमध्ये नाशिक शहरातील नऊ, नाशिक ग्रामीणचे तीन, मालेगाव महापालिका हद्दीतील एक बाधिताचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. जिल्‍ह्‍यातील एकूण बाधितांचा आकडा ६१ हजार १२० वर पोहोचला आहे. तर ४९ हजार ६१९ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. १ हजार १३९ रूग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

दरम्‍यान दिवसभरात नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १ हजार ९०८ संशयित आढळून आले. तर नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १५९, मालेगाव महापालिका क्षेत्रातील रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ४१, डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात २९, तर जिल्‍हा रूग्‍णालयात बारा संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ४३८ संशयितांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी ९६१ अहवाल नाशिक ग्रामीणचे आहेत.  

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

 

संपादन - रोहित कणसे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 thousand 534 new corona patients in nashik district marathi news