थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

संजीव निकम
Thursday, 17 September 2020

बुधवारी (ता.१६) रात्री हिसवळ खुर्द येथील गावानजीकच्या द्वारका नदीला पूर आल्याने नदीवरील पुलावरून बळजबरीने पुलावरून  वाहन चालविण्याच्या प्रयत्नात अल्टो गाडी वाहून गेली. ही थरारक दृश्ये मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

नाशिक / नांदगाव  : बुधवारी (ता.१६) रात्री हिसवळ खुर्द येथील गावानजीकच्या द्वारका नदीला पूर आल्याने नदीवरील पुलावरून बळजबरीने पुलावरून  वाहन चालविण्याच्या प्रयत्नात अल्टो गाडी वाहून गेली. ही थरारक दृश्ये मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

थरारक दृश्ये मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद; काय घडले?

हिसवळ खुर्द येथील एक व्यक्ती हा गावाकडे रात्री अल्टोने येत होता.याच सुमारास भालूर मोहेगाव परिसरातील प्रचंड पर्जन्यवृष्टीमुळे या भागातील लहानमोठे तलाव बंधारे ओसंडून वाहू लागल्याने नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर पाणी आले होते. हिसवळ खुर्दजवळही द्वारका नदीला पूर आला.या पूरातून खडी वाहणाऱ्या डंपरचालकाने आपले वाहन काढले. ते सुरक्षित गेल्याचे बघून पाठीमागे असलेल्या अल्टो कारचालक यानेही आपली गाडी टाकली.

 

पूराच्या आवेगापुढे निभाव न लागल्यामुळे अल्टो कार गटागंळ्या खावू लागली.व वाहू लागली. समाधानने दरवाजा उघडून बाहेर उडी टाकली. गावकऱ्यांनी त्याला पुरातून बाहेर काढले त्यामुळे तो बचावला मात्र त्याच्यासोबत असलेला एक सहप्रवासी मात्र वाहत्या पाण्यात वाहनासोबत वाहून गेला. हा प्रवासी मनमाड येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे .त्याचा शोध घेतला जात आहे.

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

एक बचावला तर दुसरा वाहून गेला.

अल्टोत दोन जण होते. यापैकी एक बचावला तर दुसरा पूराच्या लोंढ्यात अडकलेल्या अल्टोसह  वाहून गेला त्याचा शोध घेतला जात आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: car drown in the river flood nandgaon nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: