esakal | मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ
sakal

बोलून बातमी शोधा

funeral 123.jpg

एकाच कुटुंबातील तीन व्यक्तीचे एकापाठोपाठ निधन झाल्याची ही तिसरी घटना आहे. या घटनेमुळे परिसरात मोठा मानसिक हादरा बसला आहे. मनाला चटका लावणाऱ्या बातमीने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. काय घडले वाचा...

मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / देवळाली : एकाच कुटुंबातील तीन व्यक्तीचे एकापाठोपाठ निधन झाल्याची ही तिसरी घटना आहे. या घटनेमुळे परिसरात मोठा मानसिक हादरा बसला आहे. मनाला चटका लावणाऱ्या बातमीने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. काय घडले वाचा...

मुलाचा विरह आणि तिंघाची निघाली अंत्ययात्रा

गणेश झळके हा युवक गेल्या काही दिवसांपासून बिटको कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल होता. चार दिवसांपूर्वी त्याचे निधन झाले होते. याच रुग्णालयात त्याचे वडील अशोक झळके आणि आई शालिनी झळके यांच्यावर देखील वैद्यकीय उपचार सुरू होते. दरम्यान, गणेशचे रविवारी(ता.१३)  निधन झाले. मुलगा गणेशच्या आकस्मिक निधनाचा विरह सहन न झाल्याने त्याचे वडील अशोक झळके यांना जबर मानसिक आघात बसला. या मानसिक आघातातून ते सावरू न शकल्याने अखेर त्यांचे मंगळवारी(ता.१५) निधन झाले. मुलगा गणेश आणि पती अशोक यांच्या निधनाची माहिती मिळाल्यावर मानसिकदृष्ट्या खचलेल्या शालिनी झळके यांचेही बुधवारी(ता.१६) रात्री दुर्दैवी निधन झाले.

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

लहान भाऊ मात्र रुग्णालयात दाखल

एकाच कुटुंबातील तीन व्यक्तीचे एकापाठोपाठ निधन झाल्याची ही तिसरी घटना आहे. या घटनेमुळे संपूर्ण लिंगायत समाजबांधवांना मोठा मानसिक हादरा बसला आहे. अशोक झळके हे सेवानिवृत्त प्रेस कामगार, तर त्यांच्या पत्नी शालिनी या गृहिणी होत्या. गणेश हा वाहनचालक म्हणून काम करीत होता. गणेशच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार असून, त्याच लहान भाऊदेखील रुग्णालयात उपचारार्थ दाखल आहे.

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

एकापाठोपाठ वडील आणि आईनेदेखील प्राण सोडले

घरातील कमावत्या मुलाच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने एकापाठोपाठ वडील आणि आईनेदेखील प्राण सोडल्याची घटना देवळाली गाव येथे घडली. निधन झालेल्या या तिघांत मुलगा गणेश झळके, वडील अशोक झळके आणि आई शालिनी झळके यांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील मुलगा आणि त्याच्या आईवडिलांच्या निधनामुळे देवळाली गावातील लिंगायत समाजबांधवांची शोकाकूल अवस्था झाली असून, संपूर्ण देवळाली गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.