11 वीच्या ऑनलाइन प्रवेशाची तारीख जाहीर...'या' तारखेपासून भरावा लागणार अर्ज!

admission.jpeg
admission.jpeg

नाशिक : शिक्षण विभागातर्फे यापूर्वी इयत्ता अकरावी प्रवेशाकरीता अर्ज भरण्याची प्रक्रिया बुधवार (ता.15) पासून सुरु होणार होती. मात्र मंगळवारी (ता.14) रात्री उशीरा परीपत्रक जारी करून वेळापत्रकात शिक्षण विभागाने बदल केले आहे. नाशिक महापालिका क्षेत्रासह पुणे, पिंप्री-चिंचवड, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्र, मुंबई महानगर क्षेत्रात ऑनलाइन केंद्रिभूत पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.

निकालानंतरच महाविद्यालय पर्याय निवडता येणार

सुधारीत वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याची प्रक्रिया 26 जुलैपासून सुरू होईल. तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे पर्याय निवडीसाठी अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन केंद्रिभूत पद्धतीने राबविली जात असते. या पार्श्‍वभुमिवर यंदाही अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जारी केले होते. परंतु कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार संपूर्ण प्रक्रियेला मुदतवाढ मिळालेली आहे. यात उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करण्याची मुदत 22 जुलैपर्यंत असेल. तर उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी भरलली माहिती तपासून ऑनलाईन प्रमाणित करण्याची प्रक्रिया 24 जुलैपर्यंत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत राबविली जाणार आहे.

मार्गदर्शन केंद्रांची प्रक्रिया 27 जुलैपासून 

विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याच्या प्रक्रियेला सुरवात होईल. अर्जाच्या भाग एकमध्ये वैयक्‍तिक स्वरूपाची माहिती भरण्यासह मार्गदर्शन केंद्र निवडणे आणि आपले अर्ज व्हेरीफाईड झाला आहे, याची खात्री करण्यासासाठीची प्रक्रिया 26 जुलैपासून सुरू होणार आहे. तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालय, शाखा निवडीकरीता आवश्‍यक असलेला भाग दोन भरता येणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी ऑनलाइन भरलेला अर्जातील माहिती, भाग एक ऑनलाइन तपासून व्हेरीफाय करण्यासाठी संबंधित शाळा, मार्गदर्शन केंद्रांची प्रक्रिया 27 जुलैपासून सुरू होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com