esakal | आयुक्तांची रात्री उशिरा रुग्णालयात एंट्री...चौकशीत मोठा खुलासा...नेमके काय घडले?
sakal

बोलून बातमी शोधा

nmc 1.jpg

महापालिकेच्या डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका व्यक्तीच्या तक्रारीवरून आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हुसेन रुग्णालयासह समाज कल्याण विभागाच्या कोव्हीड सेंटरला अचानक सोमवारी (ता.14) रात्री उशिरा भेट देऊन पाहणी करत परिस्थितीची शहानिशा केली अन्  झाला मोठा खुलासा...

आयुक्तांची रात्री उशिरा रुग्णालयात एंट्री...चौकशीत मोठा खुलासा...नेमके काय घडले?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका व्यक्तीच्या तक्रारीवरून आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हुसेन रुग्णालयासह समाज कल्याण विभागाच्या कोव्हीड सेंटरला अचानक सोमवारी (ता.14) रात्री उशिरा भेट देऊन पाहणी करत परिस्थितीची शहानिशा केली अन्  झाला मोठा खुलासा...

पीपीई किट घालून रुग्णांशी संवाद

आयुक्तांनी ज्या व्यक्तीने तक्रार केली त्याच्याकडे विचारणा करत तक्रारीची शहानिशा केली. त्यावेळी आपण तक्रारचं केली नसल्याचे सांगण्यात आल्याने पालिकेच्या रुग्णालयासंदर्भात चुकीच्या तक्रारी येत असल्याचे यानिमित्ताने दिसून आले. डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एक रुग्णाच्या मुलाने आयुक्त गमे यांच्याकडे सुविधा व योग्य उपचार मिळतं नसल्याची तक्रार केली होती. त्यानुसार आयुक्त गमे यांनी तक्रारीची शहानिशा करण्यासाठी स्वत:च पुढाकार घेतला. सोमवारी (ता.14) रात्री उशिरा आयुक्तांनी पीपीई किट घालून डॉ. हुसेन रुग्णालय गाठले. रुगणांशी संवाद साधताना कुठल्या अडचणी येतात याविषयी आयुक्तांनी विचारणा केली असता, खोट्या तक्रारी येत असल्याचे उघड झाले.

औषध पुरवठा, कर्मचाऱ्यांची व्यवस्थेची पाहणी

डॉक्टर वेळेवर उपचारासाठी येतात का? जेवण योग्य प्रकारे मिळते का? गरम पाणी, औषधे व काढा मिळतो का? याबाबत प्रश्न विचारल्यानंतर रुग्णांनी होकारार्थी उत्तर दिले. ज्या रुग्णासंदर्भात तक्रार करण्यात आली त्या रुग्णाने तक्रार नसल्याचे स्पष्टीकरण दिले. आयुक्त गमे यांनी रुग्णालयातील औषध पुरवठा, कर्मचाऱ्यांची व्यवस्थेची पाहणी केली.

हेही वाचा > रात्रीची वेळ..भयानक अंधार..शिक्षक चेकपोस्टवर ड्युटीवर असतानाच निघाला ६ फुटी कोब्रा!

यावेळी डॉ. नितीन रावते उपस्थित होते. समाजकल्याण विभागाच्या कोव्हीड सेंटरमध्ये जेवणाची व्यवस्थेची पाहणी केली. जेवण पुरवठा करणाऱ्या  ठेकेदाराला रुग्णांना पोटभर जेवण पुरविण्याच्या सुचना दिल्या. यावेळी कोरोना कक्ष अधिकारी डॉ.आवेश पलोड, डॉ. गरुड उपस्थित होते.

हेही वाचा > नाशिक दत्तक घेणारे कुठे गेले?...शिवसेनेचा सवाल

go to top