जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO

sneak attack goat.jpg
sneak attack goat.jpg

सर्वतीर्थ टाकेद (जि.नाशिक) : शेतकरी हिरामण खादे यांच्या पत्नी जनाबाई खादे या त्यांच्या शेतावरून शेळ्या घेऊन घरी निघाल्या असतांना रस्त्यामधेच त्यांच्या तीन महिन्यांच्या बोकडावर अचानक अजगराने धाव घेत बोकडाची शिकार केली. अजगराने बोकडाला पूर्ण वेढा मारून बोकडाला गिळण्यासाठी तब्बल पाच सहा तास प्रयत्न चालू होते.​

अजगराकडून बोकडाची शिकार; तब्बल पाच सहा तास प्रयत्न

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील वासाळी येथील वाघेवाडी शिवारात चार दिवसांपूर्वीच दिवसाढवळ्या शेतकरी बबन झोले यांच्या शेतातील राखणीला असलेला पाळीव श्वान बिबट्याने फस्त केल्यानंतर लगेचच चार दिवसानंतर बुधवार (ता.०९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एका अजगराने शेतकरी हिरामण खादे यांच्या पत्नी जनाबाई खादे या त्यांच्या शेतावरून शेळ्या घेऊन घरी निघाल्या असतांना रस्त्यामधेच त्यांच्या तीन महिन्यांच्या बोकडावर अचानक अजगराने धाव घेत बोकडाची शिकार केली.व बोकडाचा अजगराने काही क्षणार्धात पकडून गिळण्याचा प्रयत्न केला.ही घटना वासाळी परिसरात पसरताच सदर घटनास्थळी शेजारील शेतकऱ्यांनी धाव घेतली परंतु पकडलेल्या बोकडाला अजगराकडून सोडवायचे कसे हा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांना पडला बोकड मोठा असल्याकारणाने अजगराला गिळता येत नव्हता. अजगराने बोकडाला पूर्ण वेढा मारून बोकडाला गिळण्यासाठी तब्बल पाच सहा तास प्रयत्न चालू होते.

थरार पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी

यानंतर रात्री साडे दहाच्या सुमारास घटनास्थळी वासाळी येथील शेतकरी ग्रामस्थ सुनील खादे,गंगा कचरे,हिरामण खादे,बडगू कोरडे,नवनाथ खादे,संतोष कोरडे,गणेश जाधव  हे सर्वजण घटनास्थळी पोहचले व या सर्वांनी अजगराला दोरीच्या साहाय्याने फासा टाकून पकडले व अजगराच्या जबड्यात अर्धवट असलेला बोकडाला बाहेर काढले पण यात बोकडाचा जीव गेला होता. यानंतर पकडलेल्या अजगराला सर्वांनी व्यवस्थित रित्या पिंपामध्ये पकडून ठेवले. पकडलेला अजगर वनाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यासाठी सदर पिंपात ठेवलेल्या अजगराच्या संरक्षणासाठी ग्रामस्थ कुंडलिक खेताडे, नवनाथ खादे, गणेश जाधव, भरत खादे,अमोल खादे, संपत खेताडे, संतोष खेताडे,अरुण खादे आदींनी रात्रभर खडा पहारा दिला. त्यानंतर ही सर्व घटना सरपंच काशिनाथ कोरडे यांनी इगतपुरी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांना कळविली. गुरुवार (ता.१०) सकाळी ०९ :३० वाजता   वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांनी वनपरिमंडळ अधिकारी दत्तू ढोंन्नर,सर्पमित्र प्रवीण भारती, सागर रुपवते,वनरक्षक सय्यद,पाडवी,खाडे,मुज्जू यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली व सर्पमित्र प्रवीण भारती, सागर रुपवते यांच्या साहाय्याने सदर अजगराला पकडले व ताब्यात घेतले.

सर्वसामान्य ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी उपाययोजना

यावेळी सरपंच काशीनाथ कोरडे, बबन झोले, नवनाथ खांदे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. अजगराला पाहण्यासाठी जवळपास शेकडो ग्रामस्थांनी ही गर्दी केली होती. तरी इगतपुरी तालुक्यात सर्वत्र विशेष करून टाकेद-वासाळी-खेड परिसरात बिबट्याचा,जंगली जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष्य घालावे व शेतकरी सर्वसामान्य ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com