धक्कादायक! मालेगाव कोरोना इफेक्ट उठतोय पोलीसांच्या जीवावर..@142 गंभीर बाब

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 13 May 2020

मालेगाव येथे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर मालेगाव येथे पोलीस दलाची संख्या वाढवण्यात आली आहे. सध्या मालेगावात एक हजार ८०० पेक्षा अधीक पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. स्वतः पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, संदीप घुगे हेही तळ ठोकून आहेत. मालेगावात सुमारे १०० पेक्षा अधिक पोलीस व एसआरपीएफच्या जवानांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

नाशिक / मालेगाव  : मालेगावात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मालेगावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलासह परजिल्ह्यातील पोलीस कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालेगावात बंदोबस्त करणारे ग्रामीणचे पोलीस आणि राज्य राखीव दलातील जवान असे 142 पोलीस कोरोनाबाधित झाले आहेत. बुधवारी (ता.१३) सकाळपासून 24 पोलीस पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीणच्या अपर पोलीस अधिक्षकांचा सुरक्षा रक्षकही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.  गेल्या दीड महिन्यापासून ग्रामीण पोलीस बंदोबस्त करीत आहे. तर त्यांच्या मदतीला SRPFच्या तुकड्या सामील झाल्या होत्या. वाढत्या ताणामुळे काही दिवसांपासून रेल्वे पोलिसही दाखल झाले आहेत.

अनेक पोलीस अधिकारी तळ ठोकून..

दरम्यान, १०० हून अधिक पोलिसांना करोनाची लागण झाल्याचे रिपोर्टवरुन निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बंदोबस्ताच्या ठिकाणी पोलिसांची संख्या कमी झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार शासनाने रेल्वेचे ३८५ पोलीस अधिकारी व सेवक मालेगावात बंदोबस्तासाठी उपलब्धही केले आहेत. मालेगाव येथे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर मालेगाव येथे पोलीस दलाची संख्या वाढवण्यात आली आहे. सध्या मालेगावात एक हजार ८०० पेक्षा अधीक पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. स्वतः पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, संदीप घुगे हेही तळ ठोकून आहेत. मालेगावात सुमारे १०० पेक्षा अधिक पोलीस व एसआरपीएफच्या जवानांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासह करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लोहमार्ग पोलीस दलाचे ३५ अधिकारी व ३५० कर्मचारी मालेगावसाठी उपलब्ध केले आहेत. त्यामुळे पोलीस दलास मोठा दिलासा मिळाला आहे

हेही वाचा > ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या 'त्या' फोटोमागचे सत्य समजले.. तर तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

औरंगाबादच्या ७२ सीआरपीएफ जवानांना झाली होती कोरोनाची लागण 

मालेगावात दीड महिना बंदोबस्त करून परतलेल्या औरंगाबाद राज्य राखीव पोलिस दलाच्या डी कंपनीतील 72 जवानांना कोरोनाची लागण झाली होती.  देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर देशभर पोलिसांचा बंदोबस्त तैनात झाला. गरजेनुसार मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, मालेगाव, औरंगाबाद अशा ठिकाणी एसआरपीएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. ३० मार्च रोजी औरंगाबाद एसआरपीएफच्या जवानांची डी कंपनी मालेगाव येथे रवाना झाली. दीड महिन्यांचा बंदोबस्त पूर्ण करून ५ मे रोजी ही कंपनी औरंगाबादेत परतली. त्यांना श्रेयस कॉलेजमध्ये क्वॉरंटाईन करण्यात आले. ६ मे रोजी आरोग्य पथकाने त्यांचे स्वॅब घेतले होते. शुक्रवारी त्यांचे अहवाल आले.

हेही वाचा > मालेगावकरांनो..आकडा वाढत असला तरी दिलासादायक 'घटना'ही घडताहेत बरं का!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 142 policemen corona affected in Malegaon nashik marathi news